रंग माणसांचे.....(भाग - १)
माणुस?.... काही म्हणतील यात लिहण्यासारखे काय आहे? पण हा एकच विषय असा आहे ज्यावर कितिही लिहायला गेले तरी तरी ते कमीच पडेल. या जगात जेवढे रंग अस्तित्वात नाहीत तेवढे रंग आहेत माणसांचे आणि ते रंग बदलण्याचा वेग इतका आहे कि एखाद्या फेरारी गाडीला सुद्धा मागे टाकतील.(अनुभवाचे बोल). सुरुवातीपासून सुरुवात करायची म्हटलं तर (हल्ली पिक्चरची सुरुवात शेवटापासून होते) हा लेखच घ्या काही लोकं या लेखाची लांबी बघुनच नाक मुरडायला सुरुवात करतील.त्यांना वाटेल की हे वाचण्यापेक्षा Facebook आणि Instagram वर Likes करणे जास्त सोपं आहे. सगळ्यांनी वाचावं अशी अजिबात अपेक्षा नाही. वाचणारी वाचतातच त्यांना सांगायची गरज नसते. आणि कोणीतरी वाचुन मला वाह वा करावी म्हणून मी लिहतच नाही मुळी. Blog हे आपले विचार share करण्यासाठी असतात. पण यातुन माणसाची प्रवृत्ती सांगायची म्हणाली तर whats app च्या status ला लावलेल्या post च्या link ला 30 views असले तरी प्रत्यक्षात हे वाचणारी नऊ ते दहा असतात फक्त. अणखी एक असे की पुढे लिहिलेली कही वाक्यं वाचुन काहींना हा प्रश्न पडेल कि हे यानंच लिहलय ना नक्की की कुठून चोरलय? त्यांच्यासाठी एक खास माहिती अशी की मला चोरी करता येत नाही आणि मी ती कधी केलेलीही नाही. ना पैशाची (आई बाबा देतात मला), ना कुठल्या वस्तुची, ना ह्रदयाची आणि ना कुणाच्या लेख आणि कवितांची.
तर विषय असा की माणुस रंग बदलतो. वैज्ञानिक शोधांच्या मते माणसाची उत्पत्ती ही माकडापासुन झाली पण हे रंग पाहुन असं वाटतं की माणुस हा माकडापासून नाही तर सरड्याच्या विकासातून बनला असावा( माझ्या मते). माणुस हा एकमेव प्राणी आहे ज्याला विचार करण्याचे वरदान मिळाले आहे. सगळे नियम हे माणसानेच बनवले आहेत आणि तेही आपल्यासाठीच. पण ते पाळतय कोण? आता फुलपाखराचंच उदाहरण घ्या(मालिका नव्हे), न्युटनच्या गतीच्या नियमानुसार फुलपाखरु हे उडू शकत नाही. पण तरीही ते उडतेच ना! का? कारण त्याला नियम माहितच नाहीत. आपण ते त्याला लागू करायला जातो. पण ते होत नाहीत. कारण माणसाने बनवलेले नियम हे माणसाने बनवलेल्या गोष्टींनाच लागू होतात.
माणसाला मिळालली आणखी एक देणगी म्हणजे विश्वास (#विक्रांत सरंजामे- तुला पाहते रे. याचा तरी विश्वास किती खरा आहे हे ते पात्र लिहणार्या लेखकालाच माहित) (हॅशटॅग बघुन मन खुश झालं ना?) विश्वास हा माणसांतून दुरावत चाललाय. कोणाचाही कोणावरही विश्वास राहिलेला नाही. सगळी स्वार्थी होत आहेत. सगळ्यांना फक्त आपल्या कामाची पडलेली असते. आपलं काम निघालं कि रोजचे पाढे पंचावन्न. सगळे फक्त स्वतःचीच स्तुती करत असतात. लांबचं कशाला, जमुन बोलत बसलेल्या चार बायका सुद्धा स्वतःची मुलं किती चांगली(भलेही नसली तरी), किती हुशार, स्वतःच्या सुना किती कामं करतात(भलेही बसुन खात असतील, सासुला कामाला लावुन) यावरच बोलत असतात.आपलं ते किती चांगलं आणि समोरच्याचं किती वाईट हे पटवून देण्याची जणु शर्यतच लागलेली असते त्यांच्यात. अशी स्वतःची स्तुती करणाऱ्यां बद्दल मला भयंकर तिरस्कार आहे. कशाला स्वतःचे गोडवे गायचे? गुण असतील (चांगलेही आणि वाईटही) तर ते दिसतातच कि त्यात सांगायची काय गरज?
काही लोकं तर अशी असतात कि उचलली जीभ लावली टाळ्याला. मनात येईल तसे बोलत असतात. समोरच्याला काय वाटेल याचा जराही विचार करत नाहीत(विकृत कुठचे). समोरचा त्यांचं बोलणं ऐकून मेला जरी (देव करो आणि असं कधीही न होवो) तरी या महाभागांना काही फरक पडत नाही. असं कधी करू नये. समोरच्याला समजुन घ्यावं. मग बोलावं. नाहीतर माणसं व्यक्त होत नाहीत. आतल्या आतल्या आत सडतात. मग लेखनासारखा एखादा मार्ग शोधतात आणि व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात(यशस्वी नाही झाला तरीही). हल्ली कोणाजवळ व्यक्त व्हावे हाही मोठा प्रश्न आहे. समोरचा माणुस समजुन घेणारा असला पाहिजे आणि त्याला
बोल दो ना जरा
दिल में जो है छुपा
मैं किसी से कहूंगा नही
हे गाणं येणं अनिवार्य आहे.(जरा जास्त होतय वाटतं?)
अशी ही माणसं अनेक रंगांची. पण ही माणसं फक्त सुखंच शोधत असतात. दुःख कोणालाच नको असतं. पण असं जरी म्हटलं तरीही दुःख हे असतंच. फक्त त्याचा किती प्रभाव पाडून घ्यायचा हे आपल्यावर असतं. सगळ्यांच सुख हे एकसारख्या गोष्टीत असलं तरी दुःख मात्र वेगवेगळं असतं. पण ते लपवुन मग खोटं हसणं कुणाला तरी सांगण्या पेक्षा सोपं वाटतं. कारण सगळ्यांना स्वतःची अशी वेगळी (दुःख) असतात. माणसं इतकी स्वार्थी झालेत कि चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय. मग आपणही स्वार्थी का असु नये हा विचार मनात आला तर नवल नको वाटायला. म्हणुनच माणसानं बदलण्याची खुप गरज आहे. माझा मी पणा सोडून इतरांना समजून घेण्याची गरज आहे. एक वाक्य बोलताना दहा वेळा विचार करावा. प्रत्येकाने जर आपल्यामुळे दुसर्यांना त्रास होणार नाही असे वागले तर सगळेजण किती सुखी होतील. नाही का?
Written by- Gaurav Shashikant Kumbhar